
Ladki Bahin : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणांना आनंदाची बातमी आली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत जून महिन्याचा १५०० हजार रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतू यासाठी आधार कार्ड संलग्न बँक खात्याला असणे गरजेचे आहे.
लाभार्थांना येणार मेसेज
ज्या लाभार्थी महिला असतील अश्या महिलांना रजिस्टर्ड नंबर वर मेसेज दिला जाणार आहे.
बहूतेक वेळा योजनेअंतर्गत पात्र असूनहि काही महिलांना मेसेज येत नाही किंवा पैसे जमा होत नाही. त्यामुळे महिलांनी घाबरुन जाऊ नये. कारण काही वेळेस टप्याटप्याने पैसे खात्यावर जाम होतात.
पैसे जमा झाले आहेत का? तपासण्याचे 4 सोपे मार्ग
एटीएमवर किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा.
बॅंक खात्याचे ॲप असेल तर त्या ठिकाणी सुध्दा तुम्ही तपासणी करु शकतात.
इंटरनेट बँकिंग उपयोग करु शकतात.
Google Pay / PhonePe / Paytm वर सुध्दा चेक करु शकतात.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” मोठी अपडेट
२१ ते ६० या वयातील महिलांना योजनेअंतर्गत लाभ घेत येणार आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana ) महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत दोन महिन्याचे एकत्र किंवा दर महिन्याला सुध्दा १५०० रुपये दिले जातात.
महत्वाची अटी पाहा
महाराष्ट्रातील रहिवासी
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे
वय २१ ते ६०
कुटूंबाचे उत्पादन मर्यादीत पाहिजे
महिला सरकार कर्मचारी नसावी