
ladki bahin yojana latest update : महाराष्ट्र सध्या लाडकी बहीण योजना बाबत जोरदार चर्चा चालू आहे. 8 मार्च 2025 रोजी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यातील हप्ते मिळालेले आहेत. परंतु मार्च महिन्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता येणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार 13 मार्च 2025 रोजी पासून राज्यातील महिलांच्या खात्यावर हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.
ladki bahin yojana latest update 2025
आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यातील पैसे 12 मार्च पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. परंतु 12 मार्च नंतर लाडक्या बहिणींना मार्च महिन्यातील हप्ता हा मिळणार आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या महिलांनाच दोन टप्प्याद्वारे हे हप्ते वितरित केले जाणार आहे. ज्या महिलांच्या अर्जांची तपासणी झाल्यानंतर अशाच महिलांना हप्ता मिळणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना उशिरा हा हप्ता मिळू शकतो.
आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत नऊ लाखापेक्षा अधिक अर्ज हे नाकारले आहेत. आणि त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. महायुती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते परंतु विधानसभा मध्ये याबाबत कोणताही विषय न निघाल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये निराशा निर्माण झाली आहे.