
Ladki Bahin Yojana News : लाडकी बहिणीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे. निवडणूकच्या दरम्यान राज्यात महायुतीचे सरकार आले तर महिलांना 2100 रुपये देण्यात येतील असे सांगितले होते. आत्तापर्यंत कोणात्याही खात्यात २१०० रुपये जमा झालेले नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिना देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक निकष या उलट लावण्यात आलेले आहे. ज्यामुळे नऊ लाख महिलांना या योजनेअंतर्गत बाद करण्यात आले आहे.
एकापेक्षा अधिक योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई होणार का ?
यावर आता विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. अश्यात संजय गांधी निराधार आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित अनिल परब यांनी केला आहे.
यावरती तटकरे म्हटल्या की, आता दोन कोटी 63 लाख महिलांची अर्ज मिळालेले आहेत. ऑगस्टपासून योजनेअंतर्गत तपासणी चालू आहे. संजय गांधी निराधार योजने मधून आम्हाला डेटा मिळालेला मिळत. यामध्ये एक लाख 97 हजार महिलांचा समावेश आहे. संजय गांधी निराधार योजना तसेच लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त होत आहे. दोन लाख 54 हजार महिलांचा डेटा निराधार योजनेतून मिळाला आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आचारसंहिता चालू असल्यामुळे ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली होती. परंतु आम्ही डेटाची तपासणी करत आहोत, योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत असे तटकरे म्हटले आहे.
यापुढे अदिती तटकरे म्हणतात की, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ते वितरित करण्यात आली होती त्याच दरम्यान कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. आम्हाला लाडकी बहिण योजनेबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे आम्ही ही कारवाई करत आहोत. आम्हाला सर्व डेटा हा आरटीओ माध्यमातून मिळला, पाच लाख महिलांचे बँक खाते शी आधार सलंग्ण नसल्यामुळे हप्ते वितरित झाले नाही. त्यामुळे महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
त्यानंतर महिलांच्या खात्यात लाडकी बहिणी योजने अंतर्गत हप्ता वितरित करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे 65 पेक्षा अधिक व जास्त वय असतील अशा महिलांना योजनेअंतर्गत बाद केले जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत 21 ते 65 दरम्यान असलेल्या महिलांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.