
Ladki Bahin Yojana News : गेल्या काही दिवसात लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये मिळाले आहे. आता महिलांच्या खात्यावर एप्रिल मधील हप्ता हा खात्यावर कधी जमा केला जाईल ? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झालेला दिसतो. या मध्ये अनेक असा अंदाज लावत आहे की, लाडकी बहिणीचे एप्रिल महिन्यातील राम नवमीच्या दिवशी खात्यावर १५०० रुपये जमा होऊ शकतात.
या महिन्यात ८ मार्च दिवशी राज्यातील महिल्याच्या खात्यावर फेब्रवारी महिन्यातील १५०० रुपयाचा हप्ता वितरीत करण्यात आला होता. मार्च महिन्यातील पैसे हे १४ तारखेनंतर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतू एप्रिल महिन्यात पैसे कधी जमा होतील असा प्रश्न निर्माण होत आहे. मिळालेल्या माहिती नुसार लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यात ६ एप्रिल रोजी राम नवमी आहे. या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यावर १५०० रुपये जमा केले जाऊ शकतात.
बहूतांश महिलांना हप्ता मिळणार नाही ?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यात अनेक महिल अपात्र असूनहि लाभ मिळवत होत्या. परंतू यावरती राज्य सरकारने तातडीने पडताळणी केली त्यानंतर ९ लाख महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत काढून टाकण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात ४ लाख तर जानेवारी महिन्यात ५ लाख महिलांना लाभ दिला जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आता ५० लाख महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत काढण्यात येऊ शकते.
तुम्हाला या बाबत काय वाटते नक्की कमेंट करा.