
Ladki Bahin Yojana Update News Today : महाराष्ट्र सरकारने लाडके योजनेची स्थापना केली. त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. परंतु हप्ते येण्यास विलंब होत, असल्यामुळे लाडकी बहिणी मध्ये चर्चा सुरू झाली आहे. लाडके बहिण योजनेअंतर्गत महिलांना आत्तापर्यंत सात हप्ते पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आठवा व नवा हप्ता एकत्र करून मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात वितरित करण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात कमी कालावधीमध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेली आहे. त्या योजना अंतर्गत मोठ्या घराण्यातली सुद्धा महिला लाभ मिळवत होत्या, परंतु सरकार वरती अतिरिक्त खर्च वाढत असल्यामुळे यामध्ये अनेक निकष लावण्यात आले आहे. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता देण्यात येणार नाही. असे अनेक निकष लावल्यामुळे तब्बल नऊ लाख पेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत बाद करण्यात आले आहेत.
मागील महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता न आल्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार बालविकास विभागाकडे 3490 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील हप्ता एकत्र करून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा करण्याची शक्यता आहे.
2100 रुपये कधी मिळतील
गेल्या दोन-तीन महिन्यापासून महाराष्ट्रात एकच चर्चा होत आहे. १५०० रुपये 2100 रुपये महिलांच्या खात्यावर केव्हापासून जमा होण्यास सुरुवात होईल? महायुती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान महिलांना सांगितले होते की सुरुवातीला दीड हजार रुपये देऊ त्यानंतर महिलांच्या खात्यावर २१०० रुपयाचा हप्ता सुरु करू. महिलांना ७ हप्ते दीड हजार रुपये पर्यंतच मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
