
Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दहा मोठाल्या घोषणा केल्या आहेत. परंतु नमो शेतकरी योजना अंतर्गत हप्ते मध्ये वाढ न केल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. परंतू कर्जमाफी आणि भावंतर अशा विषयांना बगल मारलेली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवार यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
- महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सर्वात प्रसिद्ध योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यामध्ये दिवसा वीस पुरवठा करण्यात येणार आहे.
- बी बियाणे, शेत मालवाहतुकीसाठी, तसेच खत अशा इतर गोष्टीबाबत “बळीराजा शेत व पान रस्ते” योजना राबविण्यात येणार आहे.
- शेतीला चांगल्या प्रकारे चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांची उत्पन्न हे दुप्पट व्हावे यासाठी राज्य सरकार एक लाख एकर
- शेतीवर 500 कोटीचा निधी हा मंजूर केला जाईल तसेच पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
- बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार तीनशे कोटीचा प्रकल्प राज्य सरकार राबवणार आहेत.
- महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना” या योजनेअंतर्गत तब्बल 45 लाख कृषी पंपांना मंजुरी महाराष्ट्र सरकार देणार आहे.
- नैसर्गिक शेतीसाठी राज्य सरकार 295 कोटीचा निधी मंजूर करणार आहे. यामध्ये दोन लाख 13 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
- अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालिकेतील सांडपाण्याच्या बकरी वरती राज्य सरकार 8200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे.
- महाराष्ट्र सरकार सिंचन सुधारणा करण्यासाठी पाच हजार छत्तीस कोटी रुपयांचा खर्च उचलणार आहे
- अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच हजार 818 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत चार हजार 227 कोटी इतका खर्च राज्य सरकार करणार आहे
- धरणातील गाळ हा काढण्यासाठी गाळमुक्त धरण योजना राबवली जाणार आहे.
शेतकरी असाल तर नक्कीच आमच्या खालील दिलेल्या व्हाट्सअप बटनवर क्लिक करा आणि दररोज शेती विषय अभ्यास मिळवा