
राज्यात मॉन्सून हजेरी लावणार आहे . गेल्या ८ ते १० दिवसा पासून राज्यात पाऊस हा थांबलेला आहे. त्यानंतर राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. तीन ते चार दिवसापासून राज्यात उष्णतेमुळे उकडत होते परंतू अचानक वातवरणात बदल झाल्यामुळे सर्व सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्यानुसार २६ जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे बहूतांश ठिकाणी पुढील २४ तासात मुसळधार पाऊस पडू शकतो.
राज्यात यावेळेस वेळेवर मॉन्सून हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. “Maharashtra Monsoon Update” याविषयी गेल्या आठवड्या पासून राज्यातील सर्व चर्चा करत होते. आता हवामान विभागान दिलासा बातमी दिल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.
पुढील 24 तासात पाऊस पडणार | Maharashtra Monsoon Update
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोकण भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
मध्य महाराष्ट्र या भागात अहिल्यानगर तसेच नाशिक या भागात आज दिवस भर ढगाळ वातावरण पाहयला मिळणार, परंतू त्यांनतर बहूतांश ठिाकणी पाऊस पडू शकतो. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यातील तब्बल ७ जिल्ह्यात पुढील काही तासात बहूतांश ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो. बीड, संभाजीनगर, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव या सर्व जिल्ह्यात सुध्दा ढगाळ वातावरण व अचानक मुसळधार पाऊस पडू शकतो.
विदर्भात आज चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिचया, भंडारा, यवतमाळ, नागपूर, अमरावती, अकोला या आठ जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे. परंतू सांयकाळ पासून अनेक भागात पाऊस पडू शकतो.
वरील दिलेल्या महिती मध्ये २६ जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्यामुळे पेरणी किंवा लागवड करण्याअगोदर तज्ञांचा नक्कीच सल्ला घ्या.
पाऊस कुठे झाला आहे ?
राज्यातील अहिल्यानगर, बीड, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड या सर्व जिल्ह्यात बहूतांश भागात १० दिवस अगोदर पाऊस चांगल्याप्रकारे झालेला आहे. त्यांनतर सर्वच ठिकाणी पावसाने उघडीप घेतलेली आहे.
निष्कर्ष
वरील २६ जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे तसेच हवामान खात्यानुसार सर्व जिल्ह्यात पुढील २४ तासात पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात सुध्दा येत्या दोन दिवसात तूफान पाऊस होणार आहे.
Check this Authority