
Maharashtra Rain News : मागील काही दिवसात अनेक ठिकाणी जोर होता परंतू गेल्या दिवसात हा पावसाचा जोर कमी झालेला दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात भाग बदलत पाऊस पडत आहे. परंतू हा पाऊस प्रमाणाच्या बाहेर पडत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले चित्र पाहयला सध्या मिळाले नाही. पण हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचे आगमन पुन्हा होणार आहे.
६ जून नंतर राज्यात पावसाची सुरुवात | Maharashtra Rain News
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ६ जून अगोदर शेतातील कामे पूर्ण करुन घ्यावे. तसेच ७ जून पुन्हा राज्यात ठिक ठिकाणी पावसाची सुरुवात होणार आहे. ७ जून ते १० जून पर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१३ जून ते १७ जून पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
१३ जून रोजी राज्यात पावसाची सुरुवात होईल तर १७ जून पर्यंत पाऊस हा होत राहणार आहे. यावर्षी जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात पेरणी होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पेरणी करायची असेल तर स्वत : हा निर्णय घ्यावा.
राज्यात कुठे पाऊस पडणार ?
पुढील ४८ तासात नंदुरबार, धुळे, पारगोळा, जळगाव, मालेगाव या ठिकाणी भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, कोल्हापूर मध्ये ७ जून रोजी पावसाची शक्यता आहे. तसेच नंदुरबार आणि धुळे मध्ये पुढील ४ आणि ५ जून रोजी पावसाची शक्यता आहे. ६ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार नाही, याची दक्षात सर्वांनी घ्यावी.
Ladki Bahin Yojana : दोन महिन्यातील हप्ते एकत्र खात्यावर वितरीत होणार