
Maharashtra Weather News Today : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे फटका बसलेला आहे. यामुळे शेती पीकांचे मोठे नुकसान झालेले पाहयला मिळाले. तसेच पुढील काही तासात राज्यातील अनेक भागात पावसासाठी वातावरण असणार आहे. बहूतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. हवामान खात्यानुसार मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट किंवा जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.
तेलंगण आणि तामिळनाडू परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुध्दा गारपीट आणि वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आज पाऊस पडेल का ? | Maharashtra Weather News Today
होय, देशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक राज्यात पावसासाठी पोषक वातावरण झाले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात आज पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात गारपीटसह मुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे.
सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यात जोरदारे तसेच अनेक मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांत सुध्दा मुसळधार पावसाची शक्यता दाट आहे. ज्यामुळे ११ जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अर्लट जारी केला आहे.