
Monsoon News 2025 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट यावर्षी मॉन्सून चांगल्या प्रकारे राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात सरासर पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. 17 राज्यांमध्ये 105% पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगल्या प्रकारे पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. भारताच्या ईशान्य भागाकडे तसेच तामिळनाडू या राज्यात सुद्धा पावसाचा अंदाज कमी वर्तवण्यात आलेला आहे.
17 राज्यात मॉन्सून कसा राहिल ?
म्हटल्यानुसार, राज्यात 105% पावसाचा अंदाज असेल परंतु दहा राज्यांमध्ये सरासर हा पाऊस कमी असू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतांश राज्यांमध्ये पाऊस हा चांगला प्रकारे राहू शकतो. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज चांगल्या प्रकारे वर्तवला जात आहे. उर्वरित राज्यांमध्ये पाऊस हा कमी असू शकतो असाही अंदाज आहे.
महाराष्ट्रात मॉन्सून कशाप्रकारे राहू शकते ?
परंतु महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे पाऊस असू शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेतले पाहिजे. राज्यभरात चांगल्या प्रकारे पाऊस राहील परंतु मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. ज्यामुळे शेती पिकांची नासाडी सुद्धा पाहायला मिळू शकते. विदर्भातील भागातील काही जिल्हे सोडले तर बहुतांश भागात चांगल्या प्रकारे पाऊस होऊ शकतो आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे.
खानदेशामध्ये सुद्धा सरासर पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस असेल. कोकणातही यावर्षी पावसाची चांगल्या प्रकारे हजेरी पाहायला मिळणार आहे. किनारपट्टीवर सुद्धा पावसाचे प्रमाण हे अधिक पाहायला मिळू शकते. 2025 वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण चांगले राहिल, या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सरासर पाऊस पडू शकतो आपणास काय वाटते नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये कळवा.
