
Monsoon Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोकण तसेच विदर्भात अनेक ठिकाण्णी जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या मते, मॉन्सून हा सक्रीय झाला आहे, काही दिवसात संपूर्ण राज्यात मॉन्सून सक्रिय होईल. पुढील २४ तासासाठी अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट तसेच ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
पुढील तासात अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता
कोकण आणि घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. मुख्य म्हणज रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापूर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशीम, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात आज सर्वाधिक ढगाळ वातावरण पाहयला मिळेल तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, यामुळे हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
मान्सूनची प्रगती
राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहयला मिळत आहे. परंतू हिमाचल, जम्मू काश्मीर, पंजाब मध्ये मॉन्सून हा सक्रीय होत आहे. येत्या दोन दिवसात उत्तर प्रदेश मध्ये मॉन्सूनची हजेरी पाहयला मिळू शकते.
पुढील २४ जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो
रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, वर्धा, भंडारा
Farmer Loan Waiver : महाराष्ट्र सरकार कर्जमाफी वर ठाम, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल