
Monsoon Update : जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला परंतू राज्यातील बहूतांश ठिकाणी पाऊस हा पडलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांन वर दुबार पेरणीचे संकट उभा राहिलेले दिसत आहे. हवामान खात्यान ७ जुलै पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो, या संदर्भात हा लेख तयार करण्यात आला आहे. तसेच या महिन्यात पावसाचे वातावरण कसे राहिल हे जाणून घेणार आहे.
पुढील चार आठवड्याचा अंदाज
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. खास करुन कोकण, घाटमाथा आणि दक्षिण मराठवाड्यात बहूतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. उर्वरित भागात पावसासाठी पोषक वातावरण हे कमी राहण्याची शक्यता आहे.
के.एस. होसाळीकर, हवामान तज्ज्ञ
आजचा हवामान अंदाज
हवामान खात्याने आज रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
तसेच गोंदिया, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, गडचिरोली (विदर्भ), जळगाव, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे.
७ जुलै पर्यंत राज्यात पावसाचा कहर
चंद्रपूर, पुणे घाट, सातारा, कोल्हापूर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी हवामान खात्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण किनारपट्टी या भागासाठी हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे.
निष्कर्ष
महाराष्ट्रात पावसासाठी कोकण, घाटमाथा वर वातावरण चांगले तयार आहे. हवामान खात्यानुकसार विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. परंतू बहूतांश भागात पाऊस होत नसल्याने राज्यात दुबार पेरणीच वेळ येण्याची शक्यता आहे.
Sources:
IMD Weather Map – https://mausam.imd.gov.in
RMC Mumbai Twitter – @RMC_Mumbai
KS Hosalikar – @Hosalikar_KS