
MSP Rate : यावर्षी केंद्र सरकारने 14 पीकांचे हमीभावा वाढवले आहेत. यामध्ये सर्वात जास्त कारळे, रागी आणि कापूस या तीन पीकांना MSP मध्ये सर्वाधिक हमीभाव मिळाला आहे.
१. कापूस (Cotton) : यामध्ये दोन प्रकारच्या जाती येत आहेत. मध्यम धागा (Medium Staple) आणि लांब धागा (Long Staple) अशा प्रकारचे दोन कापसाच्या जाती येत आहेत. मध्यम धागा मध्ये ८.३ टक्के म्हणजे ५८९ रुपयांची वाढ झाली तसेच आता हमीभावमुळे ७ हजार ७१० रुपये दर झाले आहेत. लांब धागाचा कापूस असेल यामध्ये ५८९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. लांब धाग्याचे दर हे ८ हजार ११० रुपये झाले आहेत.
२. सोयाबीन (Soybean): सोयाबीनचे दर ५ हजार ३२८ दर यामध्ये ४३६ रुपयाची वाढ झाली आहे.
३. तूर (Arhar/Tur Dal): तूरीचे दर हे ८ हजार रुपये पर्यंत आहेत, तर यामध्ये ४५० रुपायांची वाढ करण्यात आली आहे.
४. मका (Maize): मका भाव २ हजार ४०० रुपये आहेत, यामध्ये १७५ रुपायाची वाढ झाली आहे.
५. ज्वारी (Sorghum) : ज्वारी मध्ये हायब्रीड आणि मालदांडी जात आहेत.
हायब्रीड (Hybrid): हायब्रीड ज्वारीचे दर ३ हजार ६९९ रुपये, तर यामध्ये ३२८ वाढवले आहेत. मालदांडी (Maldandi): मालदांडी ज्वारीचे दर मध्ये ३ हजार ७४९ रुपये, तर यामध्ये ३२८ रुपये वाढले आहेत.
६. भात (Paddy)
सामान्य (Common): सामान्य भातासाठी २ हजार ३६९ दर आहे, यामध्ये फक्त ६९ रुपयांची वाढ झाली आहे.
ए ग्रेड (Grade-A): ए ग्रेड मध्ये २ हजार ३८९ रुपयांचे दर मिळाला , यामध्ये ६७ रुपायाची वाढ झाली.
७. बाजरी (Bajra): बाजरीचे दर २ हजार ७७५ रुपये तर यामध्ये १५० रुपायाची वाढ करण्यात आली आहे.
८. रागी (Ragi/Nachni): रागी साठी ४ हजार ८८६ दर, यामध्ये सुध्दा ५९६ रुपयाची वाढ करण्यात आली आहे.
९. मूग (Moong Dal): मूग पीकांला ८ हजार ७६८ रुपये प्रति क्विंटल दर दिला तर यामध्ये फक्त ८६ रुपयाची वाढ झाली आहे.
१०. उडीद (Urad Dal): उडीद या पीकांना ७ हजार ८०० रुपये दर तर यामध्ये ४०० रुपयाची वाढ झाली.
११. भूईमूग (Groundnut): भूईमूग ७ हजार २६३ पर्यंत दर मिळाले आहेत. यामध्ये फक्तत ४८० रुपये वाढले आहेत.
१२. सूर्यफूल (Sunflower): सूर्यफूल दर हे ७ हजार ७२१ झाले यामध्ये ४४१ रुपयाची वाढ झाली.
१३. तीळ (Sesame): तीळ साठी ९ हजार ८४६ रुपये पर्यंत दर मिळाला, यामध्ये सुध्दा ५६९ वाढ करण्यात आली आहे.
१४. कारळे (Niger Seed): कारळे या शेत मालाला ९ हजार ५३६ दर चालू आहे, यामध्ये हमीभावमुळे ८२० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Monsoon Update : 15 जून पर्यंम संपूर्ण मॉन्सून विदर्भात हजेरी लावेल