नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता जमा! ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये; तुमचे स्टेटस असे तपासा

राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या धर्तीवर राज्यात राबवल्या जाणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा (Namo Shetkari Yojana) ८ वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. विधानभवनात झालेल्या एका विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमारे ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २००० रुपयांचा हप्ता थेट हस्तांतरित (DBT) करण्यात आला.

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजनेचे पैसे दिल्याने ऐन हंगामात खते, बियाणे आणि मजुरीच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या ८ व्या हप्त्याचे वितरण.
खात्यात २००० रुपये आले का? इथं चेक करा तुमचं स्टेटस.

८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ | नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता जमा!

विधानभवनातील या वितरण समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यापोटी राज्यातील एकूण ८९ लाख ७५ हजार २९८ शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर १७९८ कोटी ७८ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.” या निधीसाठी राज्य शासनाने १६ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय (GR) जारी केला होता.

विशेष म्हणजे, केंद्र सरकारचे ६००० रुपये आणि राज्य सरकारचे ६००० रुपये अशा दोन्ही योजनांमधून आतापर्यंत राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे ५४ हजार कोटी रुपयांची भरीव मदत जमा करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. (२४ मार्च २०२६ पर्यंत नमो शेतकरी योजनेच्या १ ते ७ हप्त्यांमध्ये १३,१७० कोटी रुपये वितरीत झाले होते).

तुमचे पैसे जमा झाले की नाही? असे तपासा स्टेटस

जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतील, तर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठीही पात्र आहात. तुमचा ८ वा हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता:

१. अधिकृत वेबसाईटवर जा: सर्वात आधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (nsmny.mahaonline.gov.in) भेट द्या. २. Beneficiary Status: होमपेजवर असलेल्या ‘Beneficiary Status’ (लाभार्थी स्थिती) या पर्यायावर क्लिक करा. ३. माहिती भरा: तिथे तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक टाका आणि ‘Get Data’ वर क्लिक करा. ४. स्टेटस पहा: तुमच्या स्क्रीनवर हप्त्याचे स्टेटस दिसेल. पैसे तुमच्या आधार-लिंक बँक खात्यात जमा झाले आहेत की प्रलंबित आहेत, हे तिथे स्पष्ट दिसेल.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

टीप: जर तुमचे पैसे अद्याप जमा झाले नसतील, तर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का आणि तुमचे e-KYC पूर्ण झाले आहे का, याची खात्री करा.

कांदा उत्पादक आणि कोकणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ नमो शेतकरी योजनेवरच भाष्य केले नाही, तर कांदा प्रश्न आणि कोकणातील फळबागांबाबतही महत्त्वाची माहिती दिली.

  • कांदा निर्यातीसाठी मॉरिशसशी चर्चा: देशातील ५०% कांदा महाराष्ट्रात आणि त्यातील ६०% एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. उत्पादन आणि वापराच्या व्यस्त प्रमाणामुळे कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारची आज सकाळीच बैठक झाली. कांद्याच्या निर्यातीसाठी सध्या मॉरिशस सरकारसोबत चर्चा सुरू आहे. तसेच, शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देऊन कांद्याचे क्षेत्र कमी करून पर्यायी पिकांकडे वळवण्यावरही काम केले जाईल, असे फडणवीस म्हणाले.
  • साखर उद्योगासाठी समिती: राज्यातील साखर उद्योगाला मदत करण्यासाठी शासनाने एका विशेष समितीची स्थापना केली आहे.
  • कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना दिलासा: यंदा कोकणात आंबा आणि काजू पिकाला कमी फळधारणा झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे आणि खात्यात थेट पैसे जमा झाल्याने राज्यातील कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी बांधवांनी आपले ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून या योजनेचा अखंडित लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

पीक नुकसानभरपाई: शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी १७,००० रुपये जमा; यादीत नाव असे तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment