
Onions Market : भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, केंद्र सरकारने कांदा निर्यांतीवर २० टक्के कर लावलेला होता. यामुळे कांद्याचे दर सतत घसरत राहिले. परंतू सप्टेंबर २०२४ महिन्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. १ एप्रिल २०२५ रोजी देशात कांद निर्याती वरील २० टक्के कर हा काढण्यात येईल, अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाने जारी केली आहे. यामुळे कांदा उत्पादक मध्ये प्रोसाहान तसेच कांद्याचे दर सुधारतील, यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
कांद्याचे भाव वाढणार का ? | Onions Market
२०२३ आणि २०२४ मध्ये १७.१७ लाख पर्यंत तर २०२४ ते २०२५ पर्यंत ११.६५ लाख टन देशात कांदा हा निर्यात झाला आहे. कांद्याचे दर हे दिवसांन दिवस घसरत चाले होते. परंतू कांद्याचे दर हे संमतोल राहावे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. म्हणजे देशात ३९ टक्कांनी कांदयाचे दर हे घसरले आहेत. साधारण बाजारात १० टक्कांनी कांद्याचे दर घसरले आहेत. सध्या कांद्याची आवक बाजारात वाढत असल्यामुळे राज्यात कांद्याचे दर आणखीन घसरणार होते परंतू केंद्र सरकारने कांदा निर्यात वर निर्णय घेतल्यामुळे राज्यात कांद्याच्या दरात सुधारणा होऊ शकते.
बाजार पेठेत जर कांद्याचे दर वाढले तर निर्यात पण चांगल्या प्रकारे होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो. तुम्हाला या बद्दल काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा ?