
Satbara On WhatsApp : शेतकरी मित्रांना, अनेक समस्या सामोर जावे लागते तसेच तांत्रिक अडचणीमुळे वेळ जात असतो. हाच वेळ वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने नवीन अपडेट आणली आहे. १ ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता सात बारा आणि ८अ उतारे व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. परंतू या सुविधाचा लाभ घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने फक्त १५ रुपये शल्क आकरले आहेत. आता शेतकऱ्यांना तांसन तास रांगेत उभे राहून किंवा महा ई सेवा केंद्रात अधिक वेळ वाया घालावे लागणार नाही. याच निर्णयामुळे पैश्याची बचत होणार आहे.
नोंदणी प्रक्रिया कशी करावी ?
(https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in) या अधिकृत वेबसाइट वर जाऊन प्रथम मोबाईल नंबर हा नोंदवावा, यासाठी फक्त एकदा नोंदणी करण्यासाठी ५० रुपये भरावे लागणार आहे. त्यानंतर नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणीसाठी शुल्क आकरले जाणार नाही. सुरुवातील मालकीचा पुरावा तसेच मोबाईल नंबर या दोन लागणार.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सातबारा आणि ८अ उतारे ऑनलाइन, फेरफार नोंदणी, ई रेकॉर्ड असे कागदपत्रे हे तुम्हाला WhatsApp ( Satbara On WhatsApp ) वर मिळणार आहे.
शेतकऱ्यांना लाभ होणार
- जर WhatsApp वर कागदपत्रे मिळाले लागले तर एजंट मध्ये राहणार नाही.
- सरकारी अधिकृत वेबसाइटवर कमी पैश्यात तुम्हाला कागदपत्रे मिळतील.
- प्रवास इतर सूचना तातडीने मिळतील
१ ऑगस्ट पासून सुविधा उपलब्ध होणार
हि सुविधा पुढील महिन्यात १५ जुलै लागू होणार त्यानंतर संपूर्ण राज्यात सुविधा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिलेली आहे.
निष्कर्ष:
डिजिटल पध्दतीने सुलभ आणि सोप्या पध्दतीने शेतकऱ्यांना सातबारा आणि ८अ उतारे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक धावपळ आणि प्रतिक्षा करावी लागणार नाही.