
Pik Karj News : बँकेकडून बिनव्याजी कर्ज मिळणे अत्यंत अवघड आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी मदत करणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. एक एप्रिल 2025 पासून राज्यात शासनाच्या नवीन नियमानुसार एका वर्षासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे अनिवार्य राहणार आहे. तसेच हे कर्ज शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी असणार आहे.
Pik Karj News Update 2025 | 5 लाखा पर्यंत बिन व्याजी कर्ज
त्यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज देण्यात येत असते, तरी पिकानुसार तुम्हाला कर्ज उपलब्ध होणार आहे. सोयाबीन पीक असेल तर प्रति हेक्टर नुसार 60 हजार 900 रुपये पीक कर्ज मिळणार आहे. तसेच तुरीसाठी प्रति हेक्टर पन्नास हजार 820 रुपये पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. मूग उडीद यासारख्या पिकांना 23 हजार 940 रुपये पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. पिक कर्जामध्ये आणखीन वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने असा कोणताही नियमावली जाहीर केलेली नाही. परंतु एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने आदेश जाहीर केलेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. एप्रिल पासून ज्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के आपले स्वतःचे बिनव्याजी कर्ज भरलेल्या असेल अशा शेतकऱ्यांना आणखी तीन लाखापर्यंत बिनव्याची पीक कर्ज हे देण्यात येणार आहे. तसेच दोन लाखापर्यंत कर्ज असेल तर तुम्हाला सात टक्के व्याज लागणार आहे.