
Pik Vima : 2023 मध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून राज्य सरकारने, शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला होता. परंतु अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होण्यास उशीर होत आहे. 17 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत शेतकऱ्यांना अनेक आश्वासन दिले आहेत. 202३ मध्ये जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना येत्या दहा दिवसाच्या आत पिक विमा हा खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पीक विमा कधी जमा होणार ?
2023-2024 मध्ये खरीप हंगाम मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले चित्र हे जगासमोर आले आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारकडून निधी हा सुद्धा मंजूर करण्यात आला होता, परंतु पिक विमा योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र आहे याची पडताळणी होणे बाकी होती या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना पिक विमा हा मिळत नव्हता.
पिक विमा संदर्भात अनेक अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता, प्रशासनाने यात दखल घेतली व अडचणीवर मात करून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा हा वितरित केला जाईल.