
Pik Vima 2025 : नमस्कार, कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने 260 कोटीचा अग्रीम पिक विमा हा मंजूर केलेला आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, मागील वर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तसेच सप्टेंबर महिन्यात सुद्धा पावसाने हजेरी लावली होती. परंतु हा पाऊस अवकाळी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आर्थिक आधारायची गरज होती. यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
Soybean and Cotton With Pik Vima 2025
नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये नऊ लाख 55 हजार 562 शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता. या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ट्रिगर अंतर्गत 2५8 कोटीचा, 25% पीक विमा हा मंजूर केलेला आहे. लवकरच या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, यामुळे या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थिती मेड सेशन अंतर्गत 25% अग्रीम पिक विमा हा मंजूर केलेला आहे. विमा कंपन्यानी दिलेल्या माहितीनुसार नऊ लाख 55 हजार 562 शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांसाठी २५८ कोटी ८२ लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे.
आठवडाभरात 3 हजार 175 कोटीचा पीक विमा जमा होणार
