
Pik Vima : महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. प्रत्यक्षात पाहिले तर अनेक जिल्ह्यांमध्ये पिक विमा हा वाटप होत नाही. परंतु असे काही जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा हा जमा केला जात आहे. हेच आपण सविस्तर पाहणार आहोत, त्या अगोदर अशाच बातम्या पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला नक्की आमच्या जॉईन व्हा.
पीक विमा वाटप सुरु | Pik Vima
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय हा जाहीर केला होता. विमा कंपन्यानी या शासन निर्णयाची दखल घेत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा हा जमा करण्यात सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यानी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा हा वाटप करत आहेत. परंतु इतर जिल्ह्यांमध्ये केव्हापासून पिक विमा हा वाटप केला जाईल हा प्रश्न नक्की पडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात सुरुवात होईल असे मत कृषी विभागाने मांडले आहे. 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थिक आधार पाहिजे होता, त्यामुळे चार ट्रिगर च्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती, परिस्थिती, काढणी पश्चात तसेच पीक कापणी या आधारावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे.
2308 कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी मंजूर केली आहे. या अंतर्गत 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना 706 कोटी रुपये तसेच नुकसान भरपाईतून एक लाख 48 हजार शेतकऱ्यांना 141 कोटी रुपये खरीप हंगामामध्ये 181 कोटी रुपये आणि 2023 ते 2024 मध्ये 63 कोटी खरीप हंगामामध्ये 2022 मध्ये २.८७ कोटी रुपये अशाप्रकारे शेतकऱ्यांना रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे. तुमच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली का नाही ? नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा.