
Pik Vima : येत्या सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सातशे दोन कोटी रुपये जमा करण्याचे उद्देश हे विमा कंपनीने ठेवलेले आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईची रक्कम ही वाढवली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. तीन हजार 175 कोटी रुपये इतका पिक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत विमा कंपन्यांनी 1773 कोटी रुपये इतका पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. तसेच उर्वरित रक्कम 1702 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे. विमा कंपन्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल.
शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार | Pik Vima
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सात दिवसात उर्वरित रक्कम ही जमा करण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात आणि प्रतिकूल परिस्थितीनुसार तक्रारी केल्या होत्या, त्याच वर्षी विमा कंपन्यांनी पीक विमा योजना चांगल्या प्रकारे राबवली होती. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग घेतला होता. शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार नुकसान भरपाईची रक्कम ठरवण्यात आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा हा जमा होईल.
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार जेव्हा निधी विमा कंपन्याकडे वितरित केली जाईल. तेव्हा ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ही ट्रान्सफर करण्यात येईल. परंतु मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 17 एप्रिल पासूनच पीक विमा हा जमा करण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विमा जमा होईल, तुमच्या खात्यावर पिक विमा जमा झाला की नाही नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद.
