
Pik Vima News : महाराष्ट्रात यावर्षी चार जिल्ह्यात पीक विमा वाटप करावा असे आदेश देण्यात आले होते. परंतू २५ टक्के आग्रीम पीक विमा हा एक जिल्ह्यात वाटप करण्यास मनाई विमा कंपन्यानी केली आहे. म्हणून एक जिल्ह्या सोडून उर्वरित तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
पीक विमा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार ?
२५ टक्के आग्रीम पीक विमा चार पैकी तीन जिल्ह्यांना वाटप केला जाणार आहे. यामध्ये नांदेड, परभणी आणि हिंगोली या मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाणार आहे. विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या तीन जिल्ह्यात १८ लाख ८४ हजार शेतकरी पात्र असून, या शेतकऱ्यांना ७०५ कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे. परभणी मध्ये २९६ कोटी ८८ लाख तर हिंगोली मध्ये १५४ कोटी ३६ लाख रुपये आणि नांदेड मध्ये २५४ कोटी ५९ लाख रुपये इतका निधी वाटप होणार आहे.
शेती साठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
पुढील ४८ तासानंतर राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप सुरु होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पीक विमा संदर्भात चार जिल्ह्यांना पीक विमा वाटप करण्यास आदेश दिले होते. परंतू विमा कंपन्यानी यवतमाळ सोडून बाकी सर्व जिल्हांना पीक विमा वाटप होणार आहे. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपन्यांनी अर्ज फेटाळले.
गेल्या सात ते आठ वर्षा पासून राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, ओला दुष्काळ, दुष्काळ तसेच रोगराई असे इतर कारणामुळे राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती हि दिवसांन दिवस बिकट होत चाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तसेच उत्पादन वाढत नाही, मालाला मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांना शेती करायला परवडत नाही.