
Pik Vima : दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वारंवार पीकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकाराने १ रुपायात पीक विमा जाहिर केला आहे. १ रुपये मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भेटत असल्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे हजरी लावली आहे. यामध्ये ३ लाखा हून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा मध्ये सहभाग घेतल्याची नोंद आहे.
पीक विमा मंजूर | Pik Vima
यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस न झाल्यामुळे पीक जळून गेली तसेच अनेक ठिकाणी पुरेसे पाणी न मिळल्यामुळे उत्पादन फारसे झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीक विमा वाटप केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना आधार मिळावा तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी राज्य सरकारने तातडीने पीक विमा मंजूर केला होत. यामध्ये २२ कोटी १६ लाख रुपये फक्त ९८ हजार ३७२ शेतकऱ्यांना नुकसान भरपााई मंजूर केली होती. दुसऱ्या टप्यात ७८ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आले तसेच या शेतकऱ्यांना १९ कोटी ३७ लाख रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. परंतू हि रक्कम दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात येणार होती परंतू अनेक शेतकऱ्यांना हि रक्कम पोहवच झाली नाही.
आतापर्यंत ६१ हजार ८२० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १४ कोटी ७० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे. उर्वरित १४ हजार ९९३ शेतकऱ्यांना २ कोटी ६७ लाख रुपये वितरीत करणे बाकी आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी १ रुपये मध्ये पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शासन निर्णय नुसार यापैकी ९८ हजार ३७२ शेतकरी पात्र असल्याचे म्हटले गेले आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत 20 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार ?