
Pik Vima : खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता. परंतू अजूनहि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये नाराजगी आहे. अखेर आम्हाला पीक विमा कधी मिळणार ? असा थेट प्रश्न सरकारला शेतकऱ्यांनी विचारला आहे.
३० सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांन साठी शासन निर्णय जाहिर केला होता. यामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आग्रीम २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार तसेच शेतकऱ्यांन साठी महाराष्ट्र सरकारने ३ हजार कोटी पेक्षा अधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून मंजूर केली होती.
पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने २०२३ ते २०२६ पर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. तसेच आतापर्यंत पीक विमा कंपन्याकडे राज्य सरकारने ५० टक्के रक्कम वितरीत करण्यात आली आहे. म्हणजेच १५६६ कोटी रुपये हे विमा कंपन्याकडे आहे.
विमा कंपन्याकडे ऐवढी रक्कम असताना पण शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर जमा होत नाही. यामुळे राज्य सरकारने यावरती विचार करुन तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करावी हि नम्र विनंती.