
Pik Vima : गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठाले निर्णय घेण्यात आलेले आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हजारो शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणार आहे. ५३ हजार शेतकऱ्यांसाठी 727 कोटी पर्यंत निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही सर्व माहिती कृषी विभागाने तसेच शेतकरी कल्याणमंत्री विभागाने जाहीर केलेली आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी 26 हजार 484 कोटी इतकी नुकसान भरपाई राज्य सरकारने दिली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी, यामुळे राज्य सरकार नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी काढत आहे. तसेच शेती पिकांची हानी होऊ नये किंवा शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती बिघडू नये, यासाठी राज्य सरकार पिक विमा मार्फत अनुदान दिले जाते.
53 हजार शेतकऱ्यांना 727 कोटीचा पिक विमा मिळणार आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये कळवा धन्यवाद