
Pik Vima News : हंगाम 2022 मधील महाराष्ट्र राज्य सरकारकडून पीक विम्याचा हप्ता हा वितरित न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात 2022 मधील प्रलंबित पिक विमा हा आता वितरित करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकार 64 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 555 कोटीचा निधी जमा करण्यास मंजुरी दिली आहे.
पीक विमा खात्यावर जमा होणार | Pik Vima News
गेल्या तीन ते चार वर्षापासून पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांना अनेक अडचण येत आहेत. राज्य सरकारकडून पीक विम्याचा हप्ता वितरित नाही झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात अडथळे निर्माण झाले. परंतु आता राज्य सरकारने यावरती तोडगा काढला आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या वाट्याचा हिस्सा 2852 कोटी इतका निधी मंजूर केला आहे.
प्रलंबित पिक विमा संदर्भात माहिती
खरीप 2022 मध्ये दोन कोटी 87 लाख तसेच 181 कोटी पीक विमा, रब्बी हंगामात 63 कोटी 14 लाख आणि 2024 मध्ये 2308 कोटी इतका निधी प्रलंबित असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणून मार्च महिन्यात 64 लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे. 64 लाख शेतकऱ्यांना पिक विमाचा पहिला हप्ता म्हणजे 255 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी सलंग्ण असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा चा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसणार अशा शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात अडथळे निर्माण होऊ शकतात.
पीक विम्याचा पहिला हप्ता 48 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार का ?