
Pik Vima News Update : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोकण विभागात मोठ्या प्रमाण अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचे शेती मालाचे नुकसान झाले होते. या साठी राज्य सरकारने ५९० कोटी १५ लाख रुपये ९९ हजार रुपये इतका निधी मंजूर केला आहे.
कुठे पीक विमा मंजूर करण्यात आला ? | Pik Vima News Update
महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२४ या कालावधी मध्ये सोयाबीन, कापूस, मूग, कांदा उडीद अशा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच फळबागाचे सुध्दा यामध्ये नुकसान झाले होते. या दरम्यान शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज होती परंतू राज्य सरकारकडून तातडीने मदत झाली नाही. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून काहीशी मदत जाहिर केली आहे. १८ मार्च रोजी राज्य सरकारने पीक विमा मंजूर केला आहे.
अमरावती विभागा मध्ये ४ लाख ९ हजार ५५९ शेतकऱ्यांना ५२४ कोटी ८४ लाख रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती या चार जिल्ह्यांमध्ये २ लाख ९८ हजार ६३६ शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे.