
Pik Vima Update : लातूर मधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४ मधील पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे. परंतू या संदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही किंवा अर्धवट रक्कम मिळाली असेल अश्या शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या तालुकस्तरीय ठिकाणी निवारण कक्षाकडे जाऊन आपली तक्रारी द्यावी, असे अहवान करण्यात आले आहे.
लातूर मध्ये लाखो शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. पीक विमा साठी ८ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता परंतू यामधून पीक विमा कंपन्यानी अनेक अर्ज हे बाद केले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसानीसाठी अर्ज केलेले समोर आले आहे.
पीक विमा संदर्भात निर्देश
जिल्ह्यास्तरीय बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी तहसिलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. पुढील चार दिवस कॅम्प चालवून शेतकऱ्यांच्या समस्या गोळा करावे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेण्याचे आदेश दिले आहेत.
जे शेतकरी अपात्र असतील अश्या शेतकऱ्यांनी १४ मे आणि १५ मे पर्यंत कॅम्प वर जाऊन आपली तक्रारी सादर करावी तसेच तक्रारीचे तपासणी करण्यात येईल.
अर्ज कश्याप्रकारे आले ?
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात लातूर जिल्ह्यात बहूतांश भागात अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व साधारण पणे ऑनालाईन पध्दतीने शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. ऑनलाईन पध्दतीने ५ लाख ८ हजार ३३२ शेतकऱ्यांनी अर्ज केले यामधुन पीक विमा कंपन्यानी १ लाख ११ हजार अर्ज शेतकऱ्यांचे बाद केले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये अक्रोश निर्माण होत आहे.
Panjab Dukh Hawaman andaj : राज्यात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडणार