
Pm Kisan : भारतात अजूनहि बहूतांश शेतकरी गरजा भागवण्यासाठी शेतीवर अवलंबून आहेत. यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांची काळजी करत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत बनवावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवावा यासाठी Pm Kisan योजना हि राबवत आहे.
Pm Kisan योजना म्हणजे काय ?
पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करतात. दर तीन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये पाठवले जातात. Pm Kisan योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात आली आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हप्ते हे वितरीत झाले आहेत. २४ फेब्रुवारी बिहार येथून १९ वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत झाला आहे. 20 वा हप्ता कधी येणार या कडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Pm Kisan योजनेअंतर्गत 20 वा हप्ता कोणाच्या खात्यावर येणार ?
१९ वा हप्ता येण्यापूर्वी केंद्र सरकारने अनेक सूचना जारी केल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केवायशी पूर्ण केली असेल, अशा शेतकऱ्यांना Pm Kisan योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. जर १९ वा हप्ता आला नसेल किंवा 20 वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही तातडीने pm kisan योजनेच्या आधिकृत वेबसाईट वर जाऊन आपली केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. जर तुम्ही ई केवायसी पूर्ण नाही केल्यास तर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार नाही.