
Pm Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी नवीन दिशा मिळावी म्हणून नवीन काही बदल करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अटीची पूर्तता करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना आता वैयक्तिक ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच फॉर्ममध्ये वैवाहिक, पालकाची, पत्नीची व इतर माहिती देणे अनिवार्य आहे.
तसेच जमीन संबंधित कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. या संदर्भात प्रथम तहसील स्तरावर तपासणी होणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर ती अंतिम तपासणी होईल जे शेतकरी अपात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना वगळण्यात येईल.
पीएम किसान या पोर्टलवर आधार संबंधित सलंगण करणे तसेच मोबाईल वरती ओटीपी मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकीचे राज्य निवडले तर शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरून तुम्ही तुमचे राज्य बदलू शकता अर्थात चुकीची नोंदणी झाल्यास गैरसमज दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती आढळली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे माहिती सादर करताना योग्य ती माहिती भरावी.
ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती भरून लाभ मिळवला आहे. अशा शेतकऱ्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने वसुली केली जाऊ शकते. म्हणून योग्य ती माहिती भरावी ज्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटा बसणार नाही.

जय जवान जय किसान