
पीएम किसान ( PM Kisan ) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता २० वा हप्ता २० जून रोजी जमा होणार आहे. परंतू याच संदर्भात वृत्त पत्रात शेतकऱ्यांना आता ६ हजार रुपये ऐवजी ३० मिळणार का ? अश्या बातम्या सगळीकडे पसरत जात आहेत.
शेतकऱ्यांच्या खात्यावर २० वा हप्ता कधी येणार ?
Pm Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता पर्यंत १९ वा हप्ता मिळाला आहे. मागील हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर १९ वा हप्ता जमा करण्यात आला आला आहे. याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २० वा हप्ता कधी मिळणार याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
सोशल मीडियानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर २० जून २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० वा हप्ता वितरीत होणार असे सागिंतले जात आहे. परंतू अद्याप केंद्र सरकारने कोणताही उल्लेख केला नसून हा सर्व अंदाज सांगितला जात आहे. काही जांणकरांच्या मते, शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ ते ३० जून कालावधीत २० वा हप्ता वितरीत केला जाऊ शकतो.
Pm Kisan योजनेअंतर्गत ३० हजार रुपये मिळणार का ?
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वाढीव रक्कम मिळणार अश्या बातम्या सोशल मीडियावर पाहयला मिळत आहे. परंतू यावर्षी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ८ जून रोजी हिमाचल प्रदेश मध्ये एका कार्यक्रमात गेले होते. त्या ठिकाणी केंद्र सरकारला सुचवले की, राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता हा ६ हजार रुपये ऐवजी ३० हजार रुपये केला पाहिजे.
शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी मागणी केली होती. परंतू या संदर्भात केंद्र सरकारने कोणताहि उल्लेख केलाला नाही.
२० हप्ता साठी शेतकऱ्यांची प्रतिक्षा
Pm Kisan योजनेअंतर्गत केंद्र सरकार दर चार महिन्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना २ हजार रुपयाचा दिला जातो. म्हणजे शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत ६ हजार रुपये दिले जातात. परंतू हा निधी पुरेसा नाही, सध्याच्या परिस्थिती प्रत्येक शेती अवजारात तसेच बियांणे आणि खता मध्ये भाव वाढले आहेत. शेतीचा खर्च दर वर्षी वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड जात आहे. थेट उपराष्ट्रपतींनी मागणी केल्यामुळे या संदर्भात चर्चा वाढली आहे.
Pm Kisan योजनेअंतर्गत हप्तासाठी अडथळे
महाराष्ट्रात जवळपास ९३ लाख पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतात. परंतू तांत्रिक अडचणीमुळे ९० ते ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होतो. जांणकरांच्या मते, केवायसी, आधार बँक सलग्न नसणे, इतर गोष्टीमुळे हप्ते जमा होत नाही. आतापर्यंत यामध्ये २ ते अडीच लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते अडकून राहतात.
निष्कर्ष
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी ६ रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची घोषणा किंवा हप्ता वाढवला नाही. २० वा कधी जमा होईल ? या संदर्भात तारीख जाहिर केलेली नाही. तसेच वार्षिक ३० हजार रुपया पर्यंत हप्ता करावा, अशी मागणी केली आहे.
अधिकृत वेबसाईट : https://pmkisan.gov.in
उपराष्ट्रपतींचे ८ जून २०२५ रोजीचे भाषण