
Pm Kisan : जगातील सर्वात मोठी योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी आहे. या योजनेअंतर्गत 19 वा हप्ता तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. शेतकरी वारंवार संकटात सापडतो, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना सुरुवात केलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत एक लाख 34 हजार 735 शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे. एक लाख 34 हजार शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 26 कोटी 94 लाख 70 हजार रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
अवकाळी पाऊस होत असल्यामुळे शेतीतून उत्पन्न कमी होते. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. मालाला योग्य भाव नाही मिळाल्यास शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, योजना शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेली आहे. या योजनेतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता द्वारे पैसे जमा होतात.
पीएम किसान योजनेतून तुम्हाला लाभ मिळत नसेल तर आपले बँक खाते आणि पॅन कार्ड हे लिंक असल्याची खात्री करून घ्यावी. कारण अनेक शेतकऱ्यांना केवायसी न केल्यामुळे या योजनेतून लाभ मिळत नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये 98 टक्के शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केल्यामुळे त्यांना पंतप्रधान योजने अंतर्गत 19 हप्ता त्यांच्या खात्यात जमा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी जागृत होत असल्यामुळे पंतप्रधान पीएम किसान योजने अंतर्गत या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.
Pik Vima Live 2025 : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार
Farmer Id : पीक विमा आणि अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ?