
PM Kisan Yojana 19th Installment : पीएम किसान सम्मान निधी योजना हि जगातील सर्वात मोठी योजना आहे. ज्यात सर्वाधिक शेतकरी लोक या योजनेचा भरपूर लाभ घेतात. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील २४ तासात जमा होणार आहे. या महिन्यात शेतकऱ्यांना तब्बल ४००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात शेतकऱ्यांची प्रगती पुरेशी झालेली नाही. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार वारंवार नव नवीन योजना किंवा शेतकऱ्यांनसाठी अनुदान उपलब्ध करत असते. पीएम किसान योजनेअंतर्गत तीन टप्पे होतात यामध्ये प्रत्येकी एका टप्यात २ हजार मिळतात म्हणजेच एका वर्षात ६००० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. तसेच राज्य सरकारने सुध्दा पीएम किसान सारखी योजना काढली आहे. त्यास नमो शेतकरी योजन म्हटले जाते. यामध्ये त्याच पध्दतीने पैसे दिले जाते.
नमो शेतकरी योजनाचे पैसे याच महिन्यात मिळणार असल्याचे संकेत आहे. तसेच नरेंद्र मोदी हे बिहार मध्ये जाणार आहेत. बिहार मध्ये दुपारे ठिक २ वाजता कार्यक्रम होणार आहे. याच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर १९ वा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली त्याच शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार आहे. PMkisan.gov.in हे केंद्र सरकारची अधिकृत वेबसाइट आहे. या साइट वर जाऊन पाहू शकतात.
Ladki Bahin Yojana Update Today : लाडकी बहिणीना आता लाभ मिळणार नाही