
Rain Update : आत्ताची सर्वात मोठी अपडेट, दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच आज गारपीट अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी अर्लट दिलेला आहे.
गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या चार जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल झालेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या चार जिल्ह्यासाठी अर्लट दिलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गारपीट मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते.
मागील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान पाहायला सुद्धा मिळाले. परंतु अनेक ठिकाणी उष्णतेची लाट सुद्धा आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी आणि जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट दिलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, लातूर, नांदेड, बीड, चंद्रपूर, भंडारा, धाराशिव, गडचिरोली, वासिम, गोंदिया, वर्धा, नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे.