
राशन कार्ड धारकांना राज्यातील 30 जून पर्यंत राज्य सरकारने अंतिम मुदत दिली आहे. अंतिम मुदत मध्ये ई केवायसी (Ration Card eKYC), कागद पत्रे इत्यादी गोष्टी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
राशन कार्ड सोबत ई केवायसी ( Ration Card eKYC ) का करावी ?
नक्कीच असा प्रश्न मना मध्ये उपस्थित होणार, कारण या संदर्भात मोठ्या प्रमाणात लोकांना माहिती मिळत नाही. राशन कार्ड धारकांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही रेशन कार्ड सोबत ई केवायसी पूर्ण नाही केली तर तुम्हाला अनेक योजने पासून रोखले जाऊ शकते. ई केवायसीमुळे खऱ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळावा यासाठी हि केवायसीत केली जात आहे.
ई केवायसी पूर्ण न झाल्यास ?
- सर्वात महत्वाचे म्हणजे धान्याचा लाभ हा दिला जाणार नाही.
- विविध योजनेत सुध्दा तुम्हाला रोखले जाऊ शकते.
ई केवायसी करण्यासाठी काय करावे ?
- सर्वात अधिकृत वेबसाईट किंवा ॲप वर जावे
- आधार क्रमांक त्यानंतर सलग्ंन असलेला नंबर वरती ओटीपी येईल
- ओटीपी टाकल्यानंतर संपूर्ण माहिती भरा
- फेस व्हेरिफिकेशन होईल
- पूर्ण आपण माहिती भरली की नाही हे तपासा आणि सबमिट करा.
ई केवायसी साठी महत्वाची कागदपत्रे
सर्व सदस्याचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, राशन कार्ड
World Blood Donation Day 2025 : वर्षातून एक व्यक्ती कितीदा रक्तदान हे करू शकतो ?