
Resowing Issue : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनवर मोठे संकट येणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे. जून महिन्यात पाऊस झाला परंतू हा पाऊस समाधानकारक नाही. बहूतांश शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केली परंतू पाऊस पुरेस होत नाही किंवा अनेक ठिकाणी पावसाने उघडीप घेतलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांन वर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
यावर्षी १२ दिवस अगोदर मान्सूनने हजेरी लावली परंतू जसा जून महिना लागला त्याच प्रकारे पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाची सुरुवात चांगली होती परंतू जून पहिल्याच आठवड्यात पावसाने उघडीप घेतली. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत चालेले आहे.
आजचा हवामान अंदाज | Weather Update
पुणे वेधशाळेच्या मते, हवामान अभ्यासक एस.डी. सानप यांच्यानुसार मॉन्सून हा कोकण आणि घाटमाथ्यावर सक्रीय आहे. तसेच मध्य महाराष्ट्रा आणि मराठवाड्यात सुध्दा अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होत राहिल. विदर्भात मोचक्याच ठिकाणी पाऊस होईल.
पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज | Weather News
राज्यातील वातावरणात पुढील तीन दिवसात होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर चांगल्या पाऊस पडेल. तसेच विदर्भात सुध्दा अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. मध्यम ते हलक्या प्रकारचा पाऊस मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पाहयला मिळण्याची शक्यता दाट आहे.
Weather : पुढील तासानंतर राज्यातील या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो
दुबार पेरणीचे संकट | Resowing Issue
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ८ जून ते १५ जूनच्या दरम्यान बहूतांश शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केलेली आहे. परंतू या दरम्यान पावसाचा जोर कमी होता तसेच भाग बदलत पाऊस पडत असल्यामुळे बहूतांश क्षेत्रात पाऊस पडलेला नाही. कृषी विभागाने दिलेल्या महिती नुसार परेणी करण्या अगोदर जमीनीची ओल तपासावी मंगच पेरणी व लागवडीचा निर्णय घ्यावा. ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट हे कमी करता येईल.
Kharif Pik Vima 2024 : शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा होणार