
Solar Energy : महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी लाभदायक निर्णय घेत आहे. गावातील ग्रामपंचायत मध्ये किंवा हाद्दीत सोलर पॅनल हे बसविण्यात येणार आहे. ज्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येते. गेल्या काही महिन्यात सोलर पॅनल ची खूप चर्चा झाली.
दिवसा वीज मिळणार
मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी योजना खूप लाभदायक आहे. कारण या योजनेअंतर्गत घरगुती सोलर पॅनल आता बसवण्यात येणार आहेत. अहिल्यानगर मधील वांबोरी ग्रामपंचायत मध्ये साडेआठ एक्कर मध्ये सोलर पॅनल हे बसवण्यात आलेले आहेत. ज्यामुळे 750 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. येणाऱ्या काळात 38०० शेतकऱ्यांना लवकरच वीज पुरवठा होईल.
तसेच आजूबाजूच्या गावाला सुद्धा दिवसा वीज पुरवणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. रात्री शेतात पाणी देणे हे धोक्याचे ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मते या प्रकारे लाडके बहिणींना लाभ दिला जातो. त्याच प्रकारे लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे.