
Weather : यावर्षी राज्यात मॉन्सून २५ मे रोजी दाखल झाला आहे. त्याअगोदर राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. मे महिन्यात दमदार पाऊस पडला परंतू राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप घेतलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडू शकतो.
कोकण, गोवा तसेच इतर ठिकाणी पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडू शकतो. असा अंदाज एस.डी.सानप यांनी दिला आहे. यांच्या मते राज्यात पुढील २४ तासात कोकण भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काल पासून मुंबई मध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे परिसरात सुध्दा पावसाने जोरदार हजेरी रात्री लावली होती. अनेक ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे वाहतूक चांगलीच जाम झाली होती.
पश्चिम महाराष्ट्रात काही डोंगर भागात दरड कोसळत आहे तसेच भविष्यात पुन्हा घटना घडू शकतात.
Kharif Pik Vima 2024 : शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा होणार