
Weather Aleart : राज्यात यावेळेत पावसाचे आगमन झाले. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रात आगमन केले. भारतीय हवामान विभागाने ( Indian Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊस पडू शकतो. यामध्ये सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर तसेच पुणे आणि मुंबई मध्ये सुध्दा जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते आहे.
पावसासाठी राज्यात पोषक वातावरण | Weather Update
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यावर्षी राज्यात १७ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार केले आहे. गुजरात झारखंड तसेच बिहार इतर राज्यात सुध्दा मॉन्सून हा सक्रिय झाला आहे.
महाराष्ट्रातील बहूतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. परंतू सध्याच्या परिस्थितीत पावसाने उघडीप घेतल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने चागंलाच धुमाकुळ घातला परंतू जसा जून महिना लागला, पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे.
हवामान खात्याचा इशारा | Weather Aleart
राज्यात पुढील पाच दिवस भाग बदलत मुसळधार पाऊस होत राहणार आहे. घाटमाथा कोकण भाग, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करुन नये, येणाऱ्या काही दिवसात राज्यात चांगल्या पाऊस पडणार आहे. बहूतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट वर्तवण्यात येत आहे. पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होत राहिल त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.