
Weather News : महाराष्ट्रात पुन्हा तीव्र गतीने पावसाची आगमन झाले आहे. गेल्या १० ते १२ दिवसापासून राज्यात बहूतांश हवामान कोरडे रहिले आहे. परंतू गेल्या दोन दिवसा पासून राज्यात उष्णतेचे प्रमाण आणि गर्मट होत आहे. याउलट हवामान खात्यानुसार राज्यात येत्या काही तासात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे.
पुढील काही तासात मुसळधार पाऊस | Weather News
रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आहे. तसेच येथील नागरिकांनी आपली काळजी घेतली पाहिजे कारण हवामान खात्यानुसार या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो. या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट सुध्दा जारी केलेला आहे. पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या सहा ठिकाणी सुध्दा पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे हवामान खात्याने इशारा दिलेला आहे.
20 जून नंतर राज्यात मुसळधार पाऊस
महत्वाचे म्हणजे २० जून पासून कोकण परिसरात वादळी पावसाची दाट वर्तवली आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुध्दा पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर मध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर या ठिकाणी सुध्दा भाग बदलत पाऊस पडणार असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. विदर्भात अचानक वातवरणात बदल होत असल्यामुळे या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आहे. या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर तीन जिल्ह्यात विविध ठिकाणी वीजासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.
Weather Tomorrow : उद्याचे हवामान अंदाज | राज्यात वादळी पावसाची शक्यता