
Weather News : महाराष्ट्रात आज सकाळ पासून अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज बहूतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
कोकण, पुणे तसेच नाशिक मध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे हवामान विभागाने येथे रेड अर्लट जारी केला आहे.
बहूतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असला तरीही हवामान खात्यानुसार पुन्हा एकदा पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच पुढील पाच दिवसाचा अंदाज | Weather News
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्यानुसार पुढील भाग बदलत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून काम करावे.
पुणे नाशिक भागात सुध्दा पुढील काही तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड तसेच कोकण भागात सुध्दा वादळी पाऊस होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी परिस्थिती पाहूनच घरा बाहेर पडावे.
Weather Aleart : पावसासाठी पोषक वातावरण | हवामान खात्याने दिला गंभीर इशारा