Weather News : राज्यातील बहूतांश जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

Weather News : राज्यातील बहूतांश जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
Weather News : राज्यातील बहूतांश जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

 

Weather News : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सून पुन्हा बरसणार आहे. खास कोकण भागात जोरदारसह पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे हवामान खात्याने या भागात अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ?

हवामान खात्याने दिलेल्या इशारा नुसार, राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर या भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे हवामान खात्याने या भागात ऑरेंज अलर्ट ( Orange Alert ) जारी केला आहे. परंतू उर्वरि भागात सुध्दा वादळी पाऊस पडू शक्यतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट ?

गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तसेच विदर्भात ढगाळ वातावरण तयार होत आहे. हवामान खात्यानुसार राज्यात परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट ( Yellow Alert ) जारी केला आहे. तरीही शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतातील कामे पूर्ण करावी.

वातावरणात बदलत परिस्थिती

पश्चिम बंगाल मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे झारखंड तसेच आसाम पर्यंत मॉन्सून हा सक्रीय ( Monsoon is active ) झालेला पाहयला मिळत आहे. हवामान खात्यानुसार पुढील ४८ तासात राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात मॉन्सून बरसणार आहे.

आताच्या परिस्थितीत, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली पाहयला मिळत आहे.परंतू विदर्भ आणि मराठवाड्यात बहूतांश भागात उष्णतेचे प्रमाण आहे.

दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी ?

हवामान खात्याने रत्नागिरी आणि रायगड मध्ये रेड अलर्ट ( Red Alert ) जारी केला आहे. यामध्ये वातावरण अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना सुध्दा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वानी सतर्क राहूनच घराबाहेर पडावे.

आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पालघर, ठाणे, सातारा, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक

वादळी पावसाचा इशारा ( येलो अर्लट जारी )

विदर्भ विभागात येलो अलर्ट : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

मराठवाडा विभागात येलो अलर्ट : जालना, परभणी, नांदेड, हिंगोली.

Weather News : पुढील काही तासात राज्यातील या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment