
Weather Tomorrow : राज्यात उद्याचे हवामान कसे असणार याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील अनेक भागात भाग बदलत पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा पावसासाठी कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे तसेच पुढील काही राज्यात चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात होण्याची शक्यता दाट आहे. महत्वाचे म्हणजे कोकणसह अनेक भागात हवामान खात्याने रेड अर्लट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार विविध ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो त्यामुळे सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात २० जून पर्यंत विविध ठिकाणी पाऊस पडत राहणार आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पाऊस वीजाची सुध्द हजेरी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे. महत्वाचे म्हणजे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड, ठाणे या तीन जिल्ह्यात ऑरेंज अर्लट आहे.
रत्नागिरी मध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. काल सायंकाळी अचानक पाऊस झाल्याने तेथील नांगरिकाचे हाल झाले आहेत. पुढील काही दिवस सतत पाऊस होऊ शकतो तसेच पावसाचा जोर अधिक वाढू शकतो असा रत्नागिरी मधील नागरिकांना देण्यात आला आहे.
उद्याचे हवामान अंदाज | Weather Tomorrow
उद्याचे हवामान, राज्यातील बहूतांश भागात पाऊस हा थांबलेला आहे. परंतू अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे उद्याचे हवामान अंदाज देण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तसेच पालघर, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी १६ जून रोजी पाऊस होऊ शकतो, यामुळे हवामान खात्याने उद्या १६ जून रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे.