
Weather Update : दर वर्षी जून महिन्यात पावसाची सुरुवात होत परंतू यावर्षी मे महिन्यातच मुसळधार पाऊस पडत आहे. असे का होत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मे महिना म्हणजे आंब्याचा मोसम असतो, कडक उन असते परंतू यावर्षी धो धो पाऊस का पडत आहे हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
Weather Update | मे महिन्यातच पाऊस का ?
हवामान अभ्यासक यांच्या मते, मे महिन्यात दर वर्षी प्रमाणे याहि वातावरणात बदल झाल्यामुळे लगेच पाऊस पडत असतो. परंतू यावर्षी प्रमाण्याच्या बाहेर मे महिन्यात पाऊस पडत आहे. कारण अरबी समुद्रात अचानक कमी दाबांचे क्षेत्र निर्माण झाले, याच दरम्यान त्याभागा मधील ओलावा शोषला जातो आणि बाष्पयुक्त ढगे हे वरती जातात. म्हणजे ज्यावेळेस हवेचे प्रमाण वाढणार त्यावेळेस बाष्पयुक्ताचे प्रमाण वाढते यामुळे पावसाचे प्रमाण वाढते.
आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाज नुसार राज्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, धुळे, नंदुरबार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.