
Pik Vima : अहिल्यानगर मधील नुकसानग्रस्त शेतकरी गेल्या सहा महिन्यापासून पीक विमा बाबत अपडेट पाहत आहेत. शेवटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 159 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मंजूर केलेली आहे. तसेच यामध्ये काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. ज्यामुळे अहिल्यानगर मधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
किती पीक विमा मंजूर | Pik Vima
पुणे विभागात खरीप हंगामासाठी प्रंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 283 कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये अहिल्यानगर मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 159 कोटी 21 लाख 54 हजार 424 रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे.
ठळक पीक विमा
नेवासा तालुक्यामध्ये 31 हजार 44 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा हा संरक्षित केला होता. यामध्ये 44 हजार 243 शेतकऱ्यांसाठी 46.52 कोटीची नुकसान भरपाई आहे. आतापर्यंत 90% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा हा जमा करण्यात आलेला आहे.
पाथर्डी आणि शेवगाव मध्ये 3 हजार 842 हेक्टर वर नुकसान झालेले असे नमूद आहे. यामध्ये 6 हजार 757 शेतकऱ्यांना शासनाकडून एक कोटी 62 लाख रुपये इतका निधी पीक विमा योजने अंतर्गत मंजूर केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई देणे बाकी आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा हा जमा करण्यात आलेला आहे.
खरीप हंगाम सुरू
राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. तसेच शेतीसाठी बी बियाणे, खते अवजारे असे साहित्याचे दर हे वाढलेले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक मदतीची गरज भासू शकते. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्याने कर्ज घेता यावे यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हा वितरित केला जात आहे. ज्यामुळे खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल.