Kharif Pik Karj Update : शेतकऱ्यांना आता येत्या सोमवारी बँकेकडून पीक कर्ज मिळण्यास सुरुवात होणारखरीप हंगामात पीककर्ज संदर्भात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक मोठ्याले निर्णय घेण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे राज्यसरकारकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना अधिक पीककर्ज मिळावे यासाठी नाबार्ड (NABARD) राज्य बँककडे ५४३ कोटीची मागणी करण्यात आली होती परंतू राज्य सरकारने यापैकी २८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. हा निधी कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना Kharif Pik Karj न मिळल्यामुळे अनेक कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट म्हणजे येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

Kharif Pik Karj : ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी तब्बल ४१२ कोटी रुपये परतफेड केली
यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कमाला केली आहे. तब्बल ५२ हजार शेतकऱ्यांना ३१ मार्च पूर्वी ४१२ कोटी रुपये परतफेड केली आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज हे मिळालेच पाहिजे. यासाठी मध्यवर्ती बँकेने राज्याच्या बँकाकडे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ५४३ कोटी रुपयाची मागणी करण्यात आली होती.
शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) मिळवण्यासाठी अडीच महिने उशीर का
गेल्या अडीच महिने मध्यवर्ती बँक शाखा पाठपुरावा करुन मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवण्याचे प्रयत्न करत होते परंतू अनेक कारणामुळे कर्ज हे रखडले आहे. कोणत्या कारणामुळे अडथळा निर्माण झाला हे जाणून घेणार आहोत.
- नाबार्ड कडून मंजुरी आणि निर्देश मिळवण्यासाठी उशीर झालेला आहे.
- तसेच राज्य सरकारच्या बँक शाखेने वेळेत निधी वितरीत न केल्यामुळे सुध्दा परिणाम पाहयला मिळत आहे.
- निधी कमी असल्यामुळे बँकेने फक्त २३ हजार ७१४ शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज दिले आहे
- यावर्षी २८ हजार शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज मिळवण्यासाठी, यावर्षी अनेक अडथळे येऊ शकतात.
येत्या सोमवारी शेतकऱ्याच्या खात्यात पीक कर्ज Shetkari Karj Update
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याना पीक कर्ज मिळण्यास सोमवार पासून सुरुवात होणार आहे. नाबार्ड ची अंतिम मंजुरी मिळली आणि राज्य बँकेने २८० कोटी रुपये कर्ज मर्यादा मंजूर केली आहे. त्यामुळे ३१ मार्च पूर्वी नियमित कर्ज फेड करणारे आणि पात्र २८ हजार शेतकऱ्यांना सोमवारपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमधून नव्याने पीककर्ज देण्यास सुरुवात करणार आहेत. या खरीप हंगामात बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी या निधीचा शेतकऱ्यांना थेट उपयोग होणार आहे.
नवीन सभासदांना पीककर्ज मिळणार का?
राज्याच्या बँकेने पीक कर्ज देण्याअगोदर काही नियम लागू केले आहेत. महत्वाचे म्हणजे जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात आणि पात्र आहेत अश्या शेतकऱ्यांना प्राथमिक कर्ज देण्यास ते बंधनकारक आहे. यामुळे नवीन सभासदांना पुन्हा एकदा निधीची मागणी केली पाहिजे तेव्हा पीक कर्ज मिळू शकते.
निकर्ष : राज्य सरकारने स्वतंत्र चर्चा करुन नवीन सभासद विषयी केली पाहिजे, कारण या शेतकऱ्यांना हि खरीप हंगामात शेती काम करण्यासाठी आर्थिक पैश्याची गरज पडणार आहे. यामुळे याहि लोकांचा विचार करुन राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

