पुढील महिन्यात महाराष्ट्रात खरीप हंगाम (Kharif Hangam) सुरु होणार आहे. यामुळे शेतकरी शेतीची मशागत वेगाने करत आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात गेल्या काही दिवसापासून रासायनिक खत्यांच्या किंमतीत (Chemical Fertilizer Prices) अचानक वाढ झालेली पाहयला मिळत आहे. याच संदर्भात मी स्व: ता अभ्यास करत आहे त्यामुळे हि माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम चालू आहे.

Fertilizer Price Hike in Maharashtra: कोणत्या खत्यांच्या किंमती वाढल्या आहेत
एनपीके (NPK Fertilizers) हे रासायनिक खत सर्वाधिक शेतकरी खरेदी करतात परंतू यावर्षी शेतकऱ्यांना हे खत खरेदी करण्यासाठी किमान १०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. याच म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) आणि एसएसपी (SSP) या खतांच्या दरात सुध्दा अश्या प्रकारे किंमती वाढल्या आहेत.
Kharif Hangam 2026 मध्ये खत्यांच्या किंमती वाढ होण्याअगोदर किती दर होते तसेच दर वाढल्यानंतर किती दर झाले हे तुम्हाला खालील टेबल मध्ये सोप्या पध्दतीने समजून येईल.
कोणते खत किती रुपयांनी महागले? (प्रति बॅग दर)
| खत प्रकार | जुने दर (₹) | नवे दर (₹) | दरातील बदल |
| युरिया | २६६ | २६६ | दर स्थिर |
| डीएपी | १३५० | १३५० | दर स्थिर |
| १०:२६:२६ | १९०० | १९०० | दर स्थिर |
| एमओपी | १५५० | १९७५ ते २०५० | ४२५ ते ५०० रुपयांची वाढ |
| एसएसपी | ५५० | ६०० ते ६४० | ५० ते ९० रुपयांची वाढ |
| २०:२०:०० (१३) | १४७५ | १८०० | ३२५ रुपयांची वाढ |
| २४:२४:०० | १९०० | २२०० | ३०० रुपयांची वाढ |
| १५:१५:१५ | १६५० | २०२५ | ३७५ रुपयांची वाढ |
| २८:२८:०० | १७५० | २२५० | ५०० रुपयांची वाढ |
| १६:१६:१६ | १४७० | १७५० | २८० रुपयांची वाढ |
| १४:३५:१४ | १८५० | २३५० | ५०० रुपयांची वाढ |
| १२:३२:१६ | १९०० | २३०० | ४०० रुपयांची वाढ |
| ०८:२१:२१ | १९७५ | २१०० | १२५ रुपयांची वाढ |
| ०९:२४:२४ | २१०० | २२०० | १०० रुपयांची वाढ |
Fertilizer Price Today: कोणत्या खत्यांचे दर वाढले नाही ?
मार्केट मध्ये अजूनहि युरिया, डीएपी, १०२६२६ या खत्यांच्या किंमतीत बदल झालेला नाही.
- युरिया (Urea Price): प्रति गोणी २६६ रुपये
- डीएपी (DAP Price): प्रति गोणी १३५० रुपये
- १०:२६:२६: प्रति गोणी १९०० रुपयांवर रुपये
खत्यांचे दर का वाढत आहे (Why Fertilizer Prices Increased?)
Agri News Update नुसार खत कंपन्यानी खत्यांच्या किंमतीत बाबत अनेक कारणे दिली आहेत ते आपण पाहणार आहोत.
- कच्चा मालाचे किंमती वाढल्या आहेत.
- इंधनाचे दर वाढल्या मुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर वाहतूकीचा खर्च होत आहे.
- कच्चा माल आणि वाहतूकीचा खर्च हे एकत्र करुन आयात शुल्काचा हा अधिक होत असल्यामुळे कंपन्याना खंताच्या किंमती वाढवल्या जात आहेत.
खरीप हंगामात काय परिणाम होईल (Impact on Farmers in Kharif Season)
यावर्षी लवकरच मान्सून येण्याची शक्यता आहे, असे मत हवामान विभागाचे आहे. परंतू खरीप हंगामात बियाणे, शेतीची मशागत आणि मजुरीचे दर हे दरवर्षी प्रमाणे मजूरी वाढत आहेत. त्यानंतर १४:३५:१४, २८:२८:०० आणि १२:३२:१६ यांसारख्या खत्यांच्या किंमती सुध्दा गेल्या दोन वर्षा पासून खरीप हंगामात वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव सुध्दा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगामात नफा होणार की नाही असा थेट प्रश्न निर्माण होत आहे. तुमचे मत आम्हला कमेंट मध्ये नक्की कळवा, धन्यवाद.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

