Pik Vima : पीक विमा योजनेत मोठे बदल

Pik Vima : पीक विमा योजनेत मोठे बदल
Pik Vima : पीक विमा योजनेत मोठे बदल

 

Pik Vima : पीक विमा योजनेअंतर्गत मोठाले निर्णय होणार आहेत. पीक विमा योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या खोट्या केस समोर आढळून आले आहेत. ज्यामुळे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आता बदल करण्याची इच्छा जाहीर करत आहे. शेतात जर पीक नसेल आणि त्यात पीक विमा काढलेला असेल अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच त्यांचा अर्ज बाद केला जाणार आहे.

बोगस पीक विमा | Pik Vima 2025

हजारो शेतकऱ्यांनी फळ पिक विमा योजनेअंतर्गत विमा नोंदवला होता. अशा शेतकऱ्यांना हवामानाच्या आधारावरती पीक विमा हा दिला जातो. मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभाग या शेतकऱ्यांची आता तपासणी करत आहे. 25 एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांची आता तपासणी होईल. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आठ हजार हून अधिक शेतकऱ्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम पुरवली जाणार नाही.

तसेच 62 हजार शेतकऱ्यांची तपासणी झाली आणि 76 हजार हेक्टर वरती विमा संरक्षण काढण्यात आलेला आहे. खरे चित्र पाहायला गेले तर 60000 हेक्टर वरच केळीची लागवड ही होती. म्हणजे 16000 हेक्टर वरती खोटेपणा करून, विमा संरक्षण काढण्यात आलेला आहे. म्हणून आता कृषी विभागाने प्रत्यक्षात शेतीची पाहणी करणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे परंतु शेतात केळ नसेल तर पीक विमा अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही. एक हेक्टर वरती केळीची लागवड करायची आणि नोंदणी चार हेक्टर पर्यंत करायची असे जर असेल तर अशा शेतकऱ्यांचा सुद्धा अर्ज हा बाद केला जाईल. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळ दाखवले आहे. वास्तविक चित्रात केळीची लागवड कमी क्षेत्रात केलेली आहे. तपासणी करत असताना कृषी विभागाने माहिती दिली की 21 हजार शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा हा भरवला आहे. यापैकी 7000 शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात आलेली नव्हती, पुन्हा एकदा अशी घटना होऊ नये म्हणून कृषी विभाग आता प्रत्यक्षात पाहणी करणार आहे.

Insurance : 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांना पहिल्यांदा पीक विमा मिळणार
Insurance : 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांना पहिल्यांदा पीक विमा मिळणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment