
Crop Insurance : अनेक ठिकाणी राज्यामध्ये पावसाची कमतरता असल्यामुळे पिकांची नासाडी झाली होती. अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे आलेला हातात घास हा निघून जातो. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसांन दिवस खालवत जात आहे. 2024 मध्ये खरीप हंगामात अचानक अवकाळी पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याकाळी राज्य सरकारने फक्त नुकसान भरपाईचे आश्वासन दिले होते. परंतु आता राज्य सरकारने पुन्हा एकदा नुकसान भरपाई बाबत आकडा जाहीर केलेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा होऊ शकतो.
22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनसाठी Crop Insurance पीक विमा मंजूर
महाराष्ट्र सरकारने तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये 2308 कोटीची पिक विमा हा मंजूर करण्यात आला होता. गेल्या दोन-तीन वर्षापासून मराठवाड्यात सुद्धा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांसाठी 1760 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विदर्भातही अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पिकांचे नासाडी होत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 489 कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु खानदेशामध्ये तीन जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
खानदेशामधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी 36 कोटीचा पिक विमा हा मंजूर करण्यात आला आहे. त्याच प्रकारे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अचानक पाऊस होत असल्यामुळे पिकांची नासाडी होते. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून नऊ कोटीचा पिक विमा हा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे.
7 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार
जिल्हा | भरपाईचा प्रकार | रक्कम (₹) |
धुळे | स्थानिक आपत्ती | २९ कोटी १ लाख |
नंदूरबार | स्थानिक आपत्ती + कापणी प्रयोग | ८ कोटी १९ लाख |
जळगाव | पीक कापणी प्रयोग | ९ लाख |
ठाणे | काढणी पश्चात नुकसान | ७ कोटी १ लाख |
रत्नागिरी | काढणी पश्चात नुकसान | ६८ लाख |
सिंधुदुर्ग | काढणी पश्चात नुकसान | १ कोटी ५७ लाख |