
Crop Insurance : गेल्या सप्टेंबर मध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पीकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज होती. हि बाब प्रशासनच्या लक्षात येताच सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना खास पीक विमा मंजूर केला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा | Crop Insurance
नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान झाले होते. यामध्ये बहूवार्षिक, बगायती आणि खरीप हंगामातील पीकांना फटका बसला होता. यानंतर तातडीने प्रशासनाने पंचनामे केले होते. यामध्ये ५ लाख ९६ हजार ५१७ हेक्टर वर शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यामध्ये ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना फटका बसला होता, या शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून ८१२ कोटी ३८ लाखाची पीक विम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाने हि मागणी पूर्ण केली.
आता पर्यंत पीक विमा कंपन्यानी ६ लाख ६५ हजार ७६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७२४ कोटी १७ लाख रुपये हे वितरीत करण्यात आले आहे.
